"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे
ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,इतिहास आणि संस्कृती यांचे उत्तम मिश्रण असलेले भविष्य काळात "मिनी महाराष्ट्र" म्हणून ओळखले जाऊ शकते. निवासीय इमारती, आयटी पार्क्स शॉपिंग मॉल स्टेडियम यांची झपाट्याने वाढ झाली असून येथे अंदाजे ३३ तलाव आहेत म्हणून या शहराला "lake city" या नावाने देखील ओळखले जाते. ठाणे शहरात अनेक पर्यटन स्थळे आहेत उपवन तलाव, येऊरचे डोंगर, मासुंदा तलाव, प्रीती शिर्डी साई बाबा मंदिर वर्तक नगर ठाणे पोखरण रोड नंबर १ तसेच प्रति तुळजापूर असलेले तुळजाभवानी मंदिर जे पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे पश्चिम या परिसरात आहे.
ठाणे स्थानकापासून या परिसरात येण्यासाठी तुम्हाला बस सेवा आणि ऑटो रिक्षा सुद्धा उपलब्ध आहेत या परिसरापासून नामदेव वाडी बस स्थानक ३ मिनिट सिद्धेश्वर तलाव ४ मिनिट आणि नितिन कंपनी केवळ ७ मिनिटांवर आहे.
दगडी खांब, उंचचउंच कळस, मंदिराच्या सभोवती गजमुख व प्रांगणात दगडी दीपस्तंभ हे वर्णन तामिळनाडू येथील एखाद्या मंदिराचे नसून असे हेमाडपंती शिल्पकलेचा अविष्कार असलेले तुळजाभवानीचे भव्य मंदिर ठाण्यात प्रत्यक्ष उभारले आहे. 'महाराष्ट्राची कुलस्वामिनी' अशी ओळख असलेल्या आई तुळजाभवानीचे हे 'प्रति तुळजापूर' मंदिर पाचपाखाडी येथील गणेशवाडी भागात साकारण्यात आले आहे.
या मंदिरामुळे ठाणे शहरात आणखी एका प्रेक्षणीय स्थळाची भर पडणार आहे. पाचपाखाडी येथे २१ वर्षे जुने तुळजाभवानीचे मंदिर होते. मात्र वाढत्या नागरिकरणानंतर हे मंदिर रस्त्यात येत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा येत होता. अखेर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. जुन्या मंदिराशेजारी चार वर्षांपासून नव्या मंदिराची उभारणीचे काम सुरु होते. या नव्या मंदिराच्या उभारणीत १३५० टन कृष्णशीळा वापरण्यात आली असून सेलम प्रकारातील दगड मंदिर उभारणीत वापरण्यात आले आहेत. तामिळनाडू व आंध्रप्रदेश येथून कर्नाटक येथील मुर्डेश्वर भागात हे दगड आणले. त्यानंतर याठिकाणी दगडांवर आखीव रेखीव कोरीवकाम करण्यात आले. २६ दगडी खांबांवर उभारलेल्या या मंदिराच्या सभोवती २० गजमुख असून तब्बल ३० फुटांचा कळस आहे. कळसासमोर नवग्रहांची रचना असून राज्यातील काही मोजक्या मंदिरात असा आविष्कार पाहता येतो. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की भेट द्या .
टिप्पण्या