गणेशोत्सव सोहळा २०२६ कळवा
गणपती बाप्पा आले, घर भरलं, मन भरलं... आणि आज निरोप द्यायची वेळ आलीय. पण हा निरोप दुःखाचा नाही, हा आहे पुन्हा लवकर येण्याच्या वचनाचा!""आपण १० दिवस बाप्पाची सेवा केली. पण विसर्जन म्हणजे काय माहिती आहे का? विसर्जन म्हणजे विसरून जाणे नाही.आपल्या शास्त्रात सांगितलं आहे - गणपती हा पार्थिव मूर्ती आहे, म्हणजे मातीपासून बनलेला. मातीतून आला आणि मातीतच मिसळणार. आपल्याला हेच शिकवतो की, जे नश्वर आहे, त्याचा अहंकार करू नये.बाप्पा पाण्यात विसर्जित होतो, पण त्याचे आशीर्वाद, त्याने दिलेली ऊर्जा, ती आपल्याच घरात ठेवून जातो. ""ठाणे आणि कळवा या ठिकाण्यातील विसर्जन म्हणजे एक वेगळाच सोहळा! कळवा परीसरात असलेले नक्षत्र गार्डन गणेश घाट ठाणे तलाव पाळी, कोपरी, मासुंदा तलाव... इथे जेव्हा 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा गजर होतो, तेव्हा डोळे नकळत पाणावतात. ढोल-ताश्याच्या गजरात, गुलालात न्हाऊन निघालेला आपला बाप्पा जेव्हा पाण्यात विलीन होतो, तेव्हा वाटतं - आपल्या घरातलं कोणीतरी लांब चाललंय.""पण जाताना बाप्पा एकच शिकवण देऊन जातो...