संधी की सुर्वणसंधी

  गेला आठवडाभर शेअर बाजारात मंदी आहे. देशांतर्गत आर्थिक स्थिती नाजूक असतानाच करोना विषाणूची बाधा शेअर बाजारालाही झाल्याने गुंतवणूकदारांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु अनेक उत्तम कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा आकर्षक भावात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने या संधीचा फायदा घेता येईल. मात्र नवीन खरेदी अथवा विक्रीही टप्प्याटप्प्याने केली जावी.काही गुंतवणूकदारांची परिस्थिती ही किनाऱ्याजवळ गळ टाकून बसलेल्या व्यक्तीसारखी असते. मासे तर पकडायचे असतात पण खोल पाण्यात जायचे नसते. यांची अपेक्षा असते की, एखादा मासा किनाऱ्याजवळ येईल आणि गळाला लागेल. तर असे गुंतवणूकदार जेव्हा एखादा शेअर घेतात तो किंमत कमी म्हणून घेतात आणि कधी तरी तो वाढेल या भावनेने त्याला वर्षांनुवर्षे ठेवतात. अशा भावनेने घेतलेला शेअर कालांतराने मोठी कमाई करून देऊ शकतो असाच एक शेअर मी तुमच्या साठी माझी गुंतवणूक या पोस्टमधून घेऊन आलो आहे.
   सुमारे ११० वर्षांपूर्वी इम्पेरियल टोबॅको कंपनी या नावाने स्थापन झालेली आयटीसी ही देशातील एक अग्रगण्य एफएमसीजी मार्केटर आहे. सुरुवातीला केवळ तंबाखू आणि सिगारेट उत्पादनात असलेली आयटीसी आज पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग उद्योगासह कृषी, हॉटेल्स, बिस्किट्स, रेडी टू इट, साबण, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन तसेच तयार कपडे अशा अनेकविध क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी असून तिची भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून देखील ओळख आहे. आयटीसीची संपूर्ण मालकीची उपकंपनी आयटीसी इन्फोटेक ही एक विशेष जागतिक डिजिटल सोल्यूशन्स प्रदाता आहे. कंपनी लवकरच डेअरी उत्पादनातदेखील पदार्पण करणार आहे. कंपनीकडे सुमारे २६,००० कर्मचारी कार्यरत आहेत.गेल्या दशकात, आयटीसीच्या नवीन कंझ्युमर गुड्स बिझिनेसजने जागतिक स्तरावरील भारतीय ब्रँडचा एक उत्तम पोर्टफोलिओ स्थापित केला आहे. आशीर्वाद, सनफिस्ट, यिप्पी!, बिंगो!, बी नॅचरल, आयटीसी मास्टर शेफ, फॅबेल, सनबिन, फिआमा, एंगेज, विव्हेल, सॅव्हलॉन, क्लासमेट, पेपरक्राफ्ट, मंगलदीप इ. अनेकविध लोकप्रिय ब्रँड्सनी अल्पावधीतच आयटीसीला मोठय़ा एफएमसीजी कंपनीचे स्थान मिळवून दिले आहे. विल्स, गोल्ड फ्लेक आणि ५५५ हे सिगारेट उत्पादनातील प्रमुख ब्रॅंड आहेत. डिसेंबर २०१९ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे.इतर क्षेत्रांच्या तुलनेत आयटीसीसारखा शेअर तुमच्या पोर्टफोलियोला नक्कीच भक्कम आधार देईल.
     संपूर्ण भारत करोनाशी लढत असताना आयटीसीने सामाजिक भान ठेवून १५० कोटी रूपयांचा विशेष फंड स्थापन केला आहे. तसेच सॅव्हलॉन सॅनिटायजर्सची किंमत देखील ७७ रुपयावरुन केवळ २७ रुपयांवर आणली आहे. आयटीसीने आपल्या गुंतवणूकदारांना कायमच भरभरून दिले आहे. आगामी कालावधीतही कंपनी आपल्या भागधारकांना खूष ठेवेल यांत शंका नाही.सध्याच्या बाजारात अगदी बऱ्याच अनुभवी गुंतवणूकदारांना सुद्धा काय घेऊ आणि काय नको असे होऊन गेले असेल. सध्या जागतिक परिस्थिती मात्र स्तब्ध आणि एका जागी खिळली आहे. करोनाचे परिणाम हे दूरगामी असल्याने बिघडलेली आर्थिक घडी पुन्हा बसायला नक्की किती काळ जावा लागेल याचा केवळ अंदाजच बांधला जाऊ शकतो. 
सुचविले शेअर्स कृपया माहितीसाठी असून प्रत्यक्ष गुंतवणूक करतांना त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांनाकडून सल्ला घ्या ही विनंती आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...