द टेस्ट ऑफ इंडिया...

मुंबई म्हणजे न झोपणारं शहर.अगदी सुरूवातीसूनच ते तसं होतं.आताची 'नाइट लाइफ',तेव्हा नव्हती.डिस्को,पबमधील दणदणाटा ऐवजी रात्री कारखाने आणि कापड गिरण्यातील यंत्रांची रात्रपाळीतील धडपड सुरू असायची. सकाळचा भोंगा वाजला की सगळ्याच मुंबईला जाग येऊ लागे.शाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या मुलांच्या जोडीला लगबग असे कामावर जाण्यार् या मोठया मंडळींचीही. त्यासाठी पहिली धाव घेतली जाई नाक्यावरच्या दूधकेंद्राकडे.

सन १९५० पासून जुन्या आठवणीच्या कप्यात आजही एक आठवण घर करून आहे.ती म्हणजे दूध केंद्र. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या अनेक ब्रँड चं दूध सर्रास उपलब्ध आहे. अमूल,गोकूळ,वारणा ही आवडते ब्रँड आहेतच. हायफाय मॉल मध्ये गेलात तर अगदी 'इम्पोर्टेड' दूध सहज मिळतात.आजच्या पिढीला काहीही अप्रूप नाही. दुधाची गाडी आली की मुंबई खऱ्या अर्थानं जागी व्हायची. सकाळच्या शांत प्रहरी काचेच्या बाटल्यांचा नाद कानावर पडायचा घाई गबडीत एखादी बाटली फुटली की रस्ता दुधी रंगाचा होऊन जायचा.सूर्य उगवतो येईपर्यंत दूध केंद्रावरील रांगा कमी व्हायच्या.घरी नेलेल्या बाटलीच्या बुचाला आतून असलेला स्निग्धपणा लहान मुलं आवडीन चाटून घ्यायची.बदलत्या काळात ही केंद्रं ओस पडू लागली.पण आजही बाटल्यांचा नाद कानात घुमत आहे. केंद्रावरून दुधाच्या बाटल्या आणण्याचं काम बऱ्याचदा घरातल्या ज्येष्ठांना करावं लागायचं असे दुधाच्या बाटल्या घरी आल्यावर त्यांच्यावर पहिला हक्क बच्चेकंपनीचा.बाटलीचं बूच उघडून थंडगार मलईचा थर चाटण्यात मजा असायची. जणू आइस्क्रीमच.बाटली उघडली की दुधाची शुभ्र धार पातेल्यात पडे चहा बरोबर पोळी बिस्कीटं किवा खारी बटर खाऊन मुलं शाळेसाठी आणि मोठी मंडळी कामासाठी रवाना होत.

त्या काळी मुंबईत धान्य आणि दूधाची प्रचंड टंचाई जाणवत असे त्यामुळे सरकारने तेव्हा धान्य आणि दूधाचं रेशनिंग सुरू केलं होतं.१९५१ मध्ये आरेमध्ये आशियातील पहिली दुग्धशाला विभाग सन १९५८ मध्ये स्थापन करण्यात आला.राज्यात ३८ दुग्धशाळा आणि ८१ शीतकरण केंद्राची स्थापना करण्यात आली.त्यापूर्वी हे दूध काचेच्या जाड बाटल्यांतून वितरित केले जाई 'होल' आणि 'टोन्ड' असे त्याचे दोन प्रकार होते. 'होल' दूध अधिक मलईदार आणि महाग त्यामुळे ते सदन कुटुंबला घेणं परवडे मध्यम वर्गीय आणि गरीब कुटुंबामध्ये तर स्वस्त 'टोन्ड' दूध घेतले जाई. 'होल' दुधाच्या बाटलीचे बूच निळ असे आणि 'टोन्ड' दुधाच्या बाटलीचं पांढरं नंतर 'स्टँडर्ड' हा आणखी प्रकार सुरू झाला.त्या दुधाच्या बाटलीचं बूच नारंगी रंगाचं असे. प्रत्येक कुटंबातील लोकांना ठराविक प्रमाणात च दूध मिळावं म्हणून सरकारी कार्ड असतं त्या कार्डवर कुटंबप्रमुखाचे नाव आणि त्याचा दूध कोट्याची नोंद असे.अगदी सुरवातीला पुठ्याचे कार्ड मिळायचे.नंतर प्लास्टिकचं कार्ड आले आणि त्यानंतर अल्युमिनियमच.त्या काळी पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी पोषक आहार म्हणून चिक्की, एखादं फळ आणि सरकारी दूध रोज मिळेल याची व्यवस्था होती. पांढऱ्या बुच्याच्या बाटलीतलं पाव लिटर दूध विद्यार्थ्यांला मधल्या सुट्टीत प्यायला मिळे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी