youtu.be/OhYc4g5CCJc लिंक दिली आहे आवडल्यास #share #like Where is jasprit bumrah...?😱 please stop experiment Mumbai Indian Management Team Watch full video and enjoy #IPL2024live
आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मातृदिन.आज, १० मे रोजी भारतासह जगभरात 'मातृदिन' उत्साहात साजरा केला जात आहे. आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस. खरंतर आईवरील प्रेम दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? किंवा एकच दिवस का? तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. पण अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. मातृदिना निमित्त पाहुया आईबद्दलचे थोरामोठ्यांचे विचार... आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी औषधावर दिलेली लिमलेटची गोळी आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात मेतकूट कालवलेला मऊ तूपभात आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही...
भाषा म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरलं जातं, ते माध्यम म्हणजे भाषा. त्यात अगदी हावभाव, कृती, ध्वनी या सर्वांचा समावेश होतो. भाषेचा नेमका उगम मात्र कसा झाला हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. आमची बोली भाषा - अहिराणी... अहिराणी भाषा ही खान्देश विभागणी बोलीभाषा शे. ही भाषा लाखो खान्देशी मानसेनि आवडनि भाषा शे.जवळपास ९५% टक्का खान्देशना लोके अहिराणी बोलतस तेसनी बोलीभाषा शे. जळगाव , धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिका जिल्हांना काही भाग्मा अहिराणी भाषा बोलतस पारोळा, एरंडोल ,सटाणा,मालेगाव ह्या तालुकास्मा सर्व जाती जामातीसनी मायबोली भाषा शे.जळगाव,नंदुरबार,धुळे त्या नासिक बागलाण, मालेगाव तयां कळवण तालुका जिल्हांना काही विशिष्ट तालुकामा अहिराणी हीच बोलीभाषा शे .ह्यामाभी पोटभाषा शे ज्याम थोडाथोडा बदल जानवस ,जसा चाळीसगाव, मालेगाव व धुळामा वेगवेगळ्या तोनामा हि बोलीजास. अहिराणी हि भाषा हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाशासन तोडीमोसन बनेल शे . परंतु अहिराणी भाषणं...
एक करंजी.. आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली.. एक दिवा.. मांगल्य भरलेला.. एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी.. एक कंदील.. यशाची भरारी घेणारा.. एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे.. एक सण.. समतोल राखणारा.. अन् एक मी..शुभेच्छा देणार... " तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा" शुभ दिपावली........
प्रशासकीय अधिका-याने ठरविले तर तो काहीही करू शकतो, हे गेले दीड वर्ष ठाणे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणा-या डॉक्टर अश्विनी जोशी यांनी अत्यंत चांगले प्रकारे दाखवून दिले त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. पूर्वीच्या काळी गुंडांकडून शासकीय अधिका-यांना त्रास होत होता पण आता हे चित्र उलटे पहावयास मिळते ज्या लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे त्यांच्याकडून आता त्रास व्हायला लागला आहे असे नेतृत्व काय कामाचे.डॉ. अश्विनी जोशी यांनी कणखर कल्पक आणि कार्यकुशल नेतृत्वाने जिल्हाधिकारी कार्यलयाच्या कारभाराला काॅर्पोरेट शिस्त लावली. वन बंधा-यापासून टाऊन हाॅलपर्यंत विविध कामे मार्गी लावली.मात्र ज्यांचे हितसंबंध धोक्यात आले त्यांनी लगेचच राजकीय दडपण आणून त्यांना हटविले. पुर्ण ठाणे जिल्ह्यातील भुमाफीया,अनधिकृत कामं करणारे लोक,खाड्या बुजवून चाळी-गोडाऊन उभारणारे,पर्यावरणाचा सत्यानाश करणारे,अवैध रेती उत्खनन करुन शासनाचा करोंडोंचा महसूल बुडवणारे,अनधिकृत केबल व्यावसायिक आदी सर्व घटकांना कायद्याचा चाप लावून त्यांचे सर्व गैर धंदे बंद पाडून सर्व सामान्यांना दिलासा देणा-या ...
गणपती बाप्पा मोरया लवकरच घरी आणुया घरीच सूरक्षित राहूया त्याचे स्वागत करूया कोरोना कसा पळतो ते पाहूया डोळ्यात आपल्या साठवूया आणि मग बाहेर पडूया जशी व्यवसायात प्रगती करूया तशीच नोकरीत प्रमोशन घेऊया सुखाने,समाधानाने जगूया... एवढेच बोलून संपवूया चला आत 2021 कसे असेल ते पाहूया. - विनायक पवार
खूप छान जुगलबंदी आहे इथे रंगली कविता आणि चारोळींची होतात इथे जबरदस्त दंगली काहीजण अप्रतीम शब्दांनी एकमेकांनासोबत नडली काहींना रविवारी देखील कामाची आहे पडली कविता आणि चारोळींच्या शब्दांवर प्रीत आमची जडली
बायकांना थोडा राग येईल.पण काही ठिकाणी वस्तुस्थिती आहे आमच्या अहिराणी बोली भाषेतील एक कविता पण ' तूच तुझी वैरी ' स्त्री पुरुष समानता विचार मले पटते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते माणसानं म्हणतात मागं ठेवल्या बाया पण एका हातानं सांगा वाजतात का टाया बाईचं सुख पाहुन बाईच आतून पेटते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते बाईच्याच बोटावर माणूस नाचत असतो कसा काय बाईले तो कमी लेखत असतो जागो जागी आपल्याले हेच दिसत असते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते एस. टी.त बाईले माणूस जागा देईन पण बाई मात्र बाईले तशीच ऊभी ठेईन आणखीनच ते आपलं फतकल मांडून बसते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते पोराच्या लग्नात हुंडा कोण मागते पोराची माय सारं घरूनच सांगते सून घरी आली की सासूलेच खूपते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते एक दिवस माह्या घरी सायी माही आली काय सांगू राज्या मले लय खुषी झाली बायकोले बापा माह्या हे बी खटकते खरं सांगतो बाईचं बाईच्या जिवावर उठते मले वाटलं सायीले सिनेमाले नेवाव बायकोची बहीण म्हणून मागीन ते देवाव बायकोले वाटे आता म...
टिप्पण्या