व्हाय वी शूड हायर यू ?
व्हाय वी शूड हायर यू ? आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी ? असा प्रश्न बर्याचदा काही मुलाखतकर्ते विचारतात. व्यक्तिश: मला या प्रश्नाचं फारसं समाधानकारक उत्तर आतापर्यंत तरी मिळालेलं नाही. मुळात हा प्रश्न विचारण्याची तशी आवश्यकताच नाही . कारण जर तुम्ही उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावलं असेल, तर हा निर्णय तुमचा आहे. उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्याइतपत काही गुण आहेत, म्हणून तुम्ही त्याला बोलावलेलं आहे. हे उघड आहे ना, पण तरीही काही महाभाग हा प्रश्न उमेदवारांना विचारतात. आणि त्यामुळे त्याचं उत्तर देणंही गरजेचं आहे. हा प्रश्न सोडून तर देता येणार नाही. मग तो नीट हॅण्डल कसा करायचा याविषयी आज जरा बोलू. काही उमेदवार या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर देतात. ‘‘तुम्ही मला बोलावलं, मग तुम्हीच सांगा.’’ असं बोलून टाकतात. आता सांगा, कोणत्या मुलाखत घेणार्याला हे उत्तर आवडेल ? नाहीच आवडत. तसंही मुलाखत म्हणजे उमेदवाराला स्वत:चं मार्केटिंग करण्याची गरज असते. अर्धा-एक तासाच्या कालावधीत तो स्वत:ला मार्केट करत असतो. त्यामुळे संपूर्ण मुलाखत ही मार्केटिंग मिटिंग असते, अशा वेळेस ह्या प्रश्नाने घाबरण्याचं किंवा गों...