प्रिय निसर्गप्रेमी......

प्रिय निसर्गप्रेमी,

डोंबिवलीच्या समृद्ध निसर्गसंपदेवर आपण सगळ्यांनीच मनापासून प्रेम केलं, करत आहोत. याच निसर्गसंपदेबद्दल

जनजागृती व्हावी म्हणून न्यास ट्रस्ट ने निसर्ग भ्रमंती सुरु केली. ट्रेल्स, स्लाईडशोज्, प्रदर्शनं असे उपक्रम सुरु असताना, न्यास च्या

हौशी पक्षीनिरीक्षकांचा अभ्यासही सुरु होताच. एच.एस.बी.सी. आणि बी. एन. एच. एस. आयोजित ‘मुंबई बर्ड रेस’ चं मॉडेल समोर

होतं. डोंबिवली आणि आसपासच्या प्रदेशात १०० पेक्षा जास्त पक्षीप्रजाती आहेत आणि ह्यालाच कारण तितके अधिवास इथे आहेत,

हे लक्षात आलं होतं. या अधिवासांद्दल जनजागृती व्हावी आणि या अधिवासांकडे वळणारे निरीक्षक वाढावेत म्हणून आम्ही  ‘मुंबई बर्ड

रेस’ च्या धर्तीवर २०१२ साली डोंबिवली बर्ड रेस सुरु केली.

डोंबिवली बर्ड रेस ला फारच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २०१२ आणि त्यानंतरची २ वर्षं बर्ड रेस उत्साहात आणि उत्तम

संख्येमध्ये सुरु राहिली. कितीतरी नवे पक्षी निरीक्षक यात तयार झाले. डोंबिवलीच्या अधिवासांद्दल नवी माहिती मिळू लागली.

स्पॉटेड इगल, ग्रे हेडेड लॅपविंग, ब्लॅक कॅप्ड किंगफिशर, ऑस्प्रे, असे कितीतरी वेगवेगळे पक्षी या निमित्ताने पाहिले गेले. पक्ष्यांचा प्रदेश

विस्तार हा बऱ्याचदा पक्ष्यांचं असणं नाही तर पक्षीनिरीक्षकांचं असणं दाखवतो. हे यातून लक्षात आलं. इथल्या अधिवासांमध्ये

असणाऱ्या खजिन्याच्या नोंदीचं महत्व पुन्हा कळलं.

गेल्या 3 वर्षांच्या बर्ड रेस मध्ये पक्षीनिरीक्षक खूप तयार झाले. त्यातले काही तर अगदी तज्ञ म्हणावेत इतका त्यांनी

अभ्यास केला. हे सगळं घडत असतानाच नष्ट होत जाणारे अधिवास आम्ही पाहत होतो. भोपरच्या टेकड्यांची आक्रसत जाणारी

झाडी, सुशोभीकरणाच्या नावाखाली निळजेच्या तलावाचं नाहीसं झालेलं नैसर्गिक सौंदर्य, खोणीचा जलपर्णीने भरून टाकलेला

तलाव, रेतीउपशामुळे खाडीची झालेली अवस्था पाहिली. पुढील काही वर्षांनी बर्ड रेस घेण्याइतके तरी पक्षी या अधिवासांमध्ये

असतील का असा प्रश्न पडायला लागला. हे पाहत असताना असं वाटलं की या नष्ट होत जाणाऱ्या अधिवासांबद्दल आपण काही करू

शकतो का? आपण जे जनजागृतीचं काम करत आहोत त्याचं स्वरूप बदलायला हवं का?

उत्तर मिळालं हो. हे स्वरूप बदलायची गरज आहे. अनेक पक्षीनिरीक्षक, निसर्गप्रेमी या उपक्रमातून तयार झाले. त्यांना

एकत्र आणायची गरज आहे. त्यांच्या भटकंतीतून जमा झालेली डोंबिवलीच्या अधिवासांची माहिती एकत्र  करण्याची, त्यातून

अधिवासांच्या परिस्थितीचं स्वरूप समजून घेण्याची आणि जर त्यावर काही उपाय शोधता आला तर तोही शोधण्याची गरज आहे. हे

लक्षात आलं आणि डोंबिवली बर्ड रेस कडून आम्ही डोंबिवली बर्ड फेस्टिव्हल कडे वळलो. खरंतर आम्ही अजूनही या कल्पनेवर

अडखळत आहोत. पण कुठेतरी सुरुवात व्हायलाच हवी.

सकाळी 3 वेगवेगळया ठिकाणी ट्रेल्स, संध्याकाळी पक्ष्यांच्या नोंदीसंबंधी चर्चा, ‘ठाणे खाडी बचाव मोहिम’ या यशस्वी

मोहिमेची गोष्ट ऐकायला मिळणार आहे. डॉ. राजू कसंबे  यांचं ‘पक्षीशास्त्रातील करीअरच्या संधी’ यावर व्याख्यान होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क :

गायत्री ओक: ९६१९९११२८९

खंजन रवाणी: ९८३३५८८४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....