पर्यावणाला ग्रहण लागेल
शहराचे सांडपाणी आणि औद्योगिक कारखान्यांचे रासायनिक पाणी पोटात घेणाऱ्या ठाणे खाडीतील वाढत्या प्रदूषणामुळे येथील ९० टक्क्यांहून अधिक मत्स्यप्रजाती नष्ट झाल्या असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. याशिवाय खारफुटी, वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग, शंख, चिंबोरी, कीटक, कोळी, दलदलीय जीवजंतू यांच्या प्रजातीही घटल्या आहेत. एकीकडे खाडीच्या पर्यावरणाला ग्रहण लागले असताना दुसरीकडे खाडी किनाऱ्यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्षांची संख्या मात्र वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे खाडी परिसरात १५५ हून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांनी हजेरी लावली आहे.ही खूप आंनदाची बाब असली तरी त्यांपैकी सात प्रजातीच्या पक्ष्यांचे अस्तित्व धोकादायक बनले आहे.त्यामुळे आता प्रदुषण थांबविणे खुपच महत्वाचे ठरणार आहे.
प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला .त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.

टिप्पण्या