डॉक्टर ! तुम्हीसुद्धा.....
गर्भलिंग चाचण्या करताना कारवाईच्या कचाट्यात अडकू नये , यासाठी सोनोग्राफी सेंटरमध्ये गणपती व लक्ष्मीचे फोटो ठेवले जातात . मुलगा असल्यास गणपतीच्या फोटोकडे आणि मुलगी असल्यास लक्ष्मीच्या फोटोकडे केवळ बोट दाखवले जाते . त्याशिवाय सांकेतिक भाषेत इंग्रजीत मंडे आणि फ्रायडे असे सांगितले जाते . मंडेच्या इंग्रजी स्पेलिंगची सुरुवात ' एम ' म्हणजे मेल आणि फ्रायडेची सुरवात ' एफ ' ने होते . ' एफ ' म्हणजे फिमेल असे सांकेतिक भाषेत सांगितले जाते . प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचण्या केल्याच्या आरोपावरून आरोग्य विभागाने राज्यातील ६० डॉक्टर व गर्भवती महिलांच्या पाच नातेवाईकांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे . त्यापैकी बहुतांश डॉक्टर पुणे , धुळे व जळगावमधील आहेत . दरम्यान , गुप्तपणे अशा चाचण्या करणाऱ्या डॉक्टरांवर गुप्तचरांमार्फत नजर ठेवण्यात येत आहे . गर्भलिंग चाचण्यांप्रकरणी दोषी डॉक्टरांवर कारवाई करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे . त्यासाठी व्हिजिलन्स व इतर गुप्तचर ...