अंधश्रद्धेच्या आहारी

 अंधश्रद्धेच्या आहारी जात मुंबईतील मुलीशी जमलेले लग्न मोडून पुन्हा गावात जाऊन अल्पवयीन विद्यार्थिनीशी विवाह करण्याचा एका सोने व्यापार्याचा डाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. मात्र आता या व्यापार्याने तिसर्या मुलीशी लग्नाचा घाट घातल्याची माहिती हाती आल्याने याविरोधात आपण दंड थोपटणार असल्याचे समितीच्या वंदना शिंदे यांनी सांगितले. भांडुप येथे राहणार्या आणि वांद्रे येथे सोन्याचे दुकान असणार्या एका सराफाने मुंबईतील एका मुलीशी विवाहाची बोलणी सुरू केली होती. मात्र अंधश्रद्धेच्या अधीन गेलेल्या त्याच्या आईवडिलांनी दोघांची कुंडली एका मांत्रिकाला दाखविली. त्यात त्यांचेगुणजुळत नसल्याचे मांत्रिकाने सांगताच जमत आलेले लग्न व्यापार्याने मोडले. म्हसवडजवळील रांजनी हे या व्यापार्याचे गाव आहे. आता या व्यापार्याने आणि त्याच्या आईवडिलांनी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील धुळदेव येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी विवाह ठरविला. दहावीतील आपल्या मैत्रिणीचा विवाह तिच्यापेक्षा वयाने खूपच मोठ्या असणार्या इसमाशी लावला जात असल्याची माहिती तिच्या मैत्रिणींना कळली. त्यांनी ही माहिती वंदना शिंदे यांच्यामार्फत सातारा जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांना कळविली. पोतदार यांनी गुप्त माहिती काढून विद्यार्थिनीसोबत विवाह होत असल्याची खात्री करून घेत ही बाब सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल पांडे यांच्या कानावर घातली. पांडे यांनी याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश म्हसवड पोलीस ठाण्याला दिले. पोलिसांनी वेगाने हालचाली करून त्या अल्पवयीन मुलीच्या वयाचा पुरावा मिळविला आणि त्यानंतर ताबडतोब तिच्या आईवडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १४९ अन्वये अल्पवयीन मुलीचे लग्न करण्याची ताकीद दिली. अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा डाव उधळला जाताच या व्यापार्याने त्या मुलीच्या आईवडिलांवर दबाव आणत जून रोजी अन्य मुलीसोबत लग्न करण्याचा घाट घातला असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हाती आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत विवाह होत असल्याची माहिती मिळताच आम्ही धुळदेवला जाऊन संबंधित मुलीच्या नातेवाइकांना कायदेशीर नोटीस दिली आहे. नवर्याकडील मंडळी जर लग्नासाठी आताच आग्रह धरत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हसवड पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक कोरे यांनी सांगितले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

एक छोटासा प्रयत्न

गणपती बाप्पा मोरया...

अभिनंदन केले पाहिजे

तूच तुझी वैरी

त्या आठवणी...