आधुनिक मामाचे गाव
आधुनिक मामाचा गाव
झुक झुक झुक आगीनगाडी
धुरांची रेषा विसरून गेली
एसीचे डबे बुक करूया मामाच्या गावाला जाऊया
धुरांची रेषा विसरून गेली
एसीचे डबे बुक करूया मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव हाय मोठा
मॉल बझारला नाही तोटा
ऑन लाईन शॉपिंगही करूया मामाच्या गावाला जाऊया
मॉल बझारला नाही तोटा
ऑन लाईन शॉपिंगही करूया मामाच्या गावाला जाऊया
मामा मोठा पगारदार
घेऊन येई ऑडी कार
लाँग ड्राईवला जाऊया
फोर व्हिलर शिकूया
मामाच्या गावाला जाऊया
घेऊन येई ऑडी कार
लाँग ड्राईवला जाऊया
फोर व्हिलर शिकूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाची बायको शिकलेली
व्हाट्सअप मध्ये गुंतलेली
तिला जोक पाठवूया
रूसलेली मामी हसवूया मामाच्या गावाला जाऊया
व्हाट्सअप मध्ये गुंतलेली
तिला जोक पाठवूया
रूसलेली मामी हसवूया मामाच्या गावाला जाऊया
मामाची बायको चटपट
रोज रोज मॅगी झटपट
पिझ्झा बर्गर खाऊया मामाच्या गावाला जाऊया
रोज रोज मॅगी झटपट
पिझ्झा बर्गर खाऊया मामाच्या गावाला जाऊया
टिप्पण्या