सैराटबद्दल ......

सैराटबद्दल,.....
निळू फुलेंनी सांगितलेल्या एका वाक्यावर  माझा विश्वास आहे. ' समाज कधी तमाशाने बिघडत नसतो,किर्तनाने सुधरत नसतो.' मला एका गोष्टीचं नवल वाटत ,ज्या समाजाने मर्डर सारखे चित्रपट स्वीकारले ,पोर्नस्टार सनी लिओनला स्वीकारले ,त्या समाजाला नागराज मंजुळेंच्या सैराटबद्दल आक्षेप असावा ? कदाचित् फँड्रीने जाती-व्यवस्थेवर मारलेल्या दगडाने जखमी झालेल्या जातीयवादी समाजाची जखम सैराट येईपर्यंतही बरी झालेली दिसत नाही. नागराज मंजुळेंजी अभिनंदन. तुप घालून वरण-भात खाण्याची सवय झालेल्या समाजाला हिरव्या मिरचीचा ठेचा वाढल्याबद्दल..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...