चित्रपट हा समाजमनाचा आरसा असतो असे मानले तर आपल्या चित्रपटातून आपण काय संदेश देत आहोत आणि समाजमनावर त्याचा काय परिणाम होणार आहे हा विचार दिग्दर्शकाने करणे अपेक्षित आहे. अनेकदा चित्रपट पाहून तरूण वाईट शिकतात, मग रामायण बघून चांगले का शिकत नाहीत, असा प्रश्न केला जातो. चित्रपट, साहित्य या सगळ्यांचाच समाजमनावर कळत नकळत परिणाम होत असतो. परिणाम होत नसेल तर त्या चित्रपटाला अर्थ तरी काय राहिला? म्हणूनच चित्रपटासारखे माध्यम अतिशय काळजीपूर्वक आणि जवाबदारीने हाताळले पाहिजे.शाहीद कपूर चा उडता पंजाब हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पुन्हा शाहीद कपूर ने आपल्या अभिनयाने सर्वाना आपली दखल घ्यायला भाग पाडले. त्याचे वडील अभिनयातले 'दादा' म्हणून ओळखले जातात. तरी त्याने त्यांची ओळख सुरूवातीच्या काळात कधी सांगितली नव्हती. त्याला नृत्याची आवड होती.नृत्यात निपुण आहे म्हणून 'दिल तो पागल है' नाहीतर 'ताल' सारख्या चित्रपटात नाचणा-यांच्या गर्दीत तो पहिल्यांदा झळकला. मग एका पॉप गाण्यात तो चमकला. त्याला पहिल्यानंतर हा पोरगेलसा दिसणारा बॉलिवूडचा हिरो...