पोस्ट्स

आपुन माग राहून कसं चालेल… !!

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांची प्रतापगडावर भेट ठरली. याप्रमाणे छत्रपती शिवराय व त्यांचे दहा अंगरक्षक प्रतापगडावर पोहचले. अफजलखान अगोदरच शामियान्यात आला ह ोता. शिवराय व त्यांचे वकील शामियान्यात गेले. अफजलखानाने शिवरायांचे स्वागत केले. आणि आलिंगन दिले. अफजलखानाने शिवरायांची मान काखेत दाबण्याचा प्रयत्न केला आणि शिवरायांच्या पाठीत बिचवा खुपसला. पण चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. तेवढ्यात शिवरायांनी खानाच्या पोटात वाघनखे खुपसली. त्याच अवस्थेत अफजलखान लव्हा...लव्हा ( वाचवा वाचवा ) म्हणत पळत सुटला. बाहेर लोहार समाजाचे संभाजी कावजी उभे होते. त्यांनी "अफजलखानाला कापला...". शामियान्यात सन्नाटा पसरला. सय्यद बंडा शिवरायांवर वार करणार तेवढ्यात, जिवाजी महाले या नाभिक समाजाच्या सैनिकाने, सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला...!! ( खरच… " होता जिवा … म्हणून वाचला शिवा !!) शामियान्याबाहेर "सिद्धी इब्राहीम" हा "शिवरायांचा मावळा" शत्रूशी एकाकी झुंज देत होता. शिवरायांनी अफजलखानाला मारल्यानंतर काम संपले होते.... विजय जवळ होता पण अचानक एक घटना घडली. अफजल...

व्हाय वी शूड हायर यू ?

इमेज
व्हाय वी शूड हायर यू ? आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी ? असा प्रश्न बर्‍याचदा काही मुलाखतकर्ते विचारतात. व्यक्तिश: मला या प्रश्नाचं फारसं समाधानकारक उत्तर आतापर्यंत तरी मिळालेलं नाही. मुळात हा प्रश्न विचारण्याची तशी आवश्यकताच नाही . कारण जर तुम्ही उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावलं असेल, तर हा निर्णय तुमचा आहे. उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्याइतपत काही गुण आहेत,  म्हणून तुम्ही त्याला बोलावलेलं आहे. हे उघड आहे ना, पण तरीही काही महाभाग हा प्रश्न उमेदवारांना विचारतात. आणि त्यामुळे त्याचं उत्तर देणंही गरजेचं आहे. हा प्रश्न सोडून तर देता येणार नाही. मग तो नीट हॅण्डल कसा करायचा याविषयी आज जरा बोलू. काही उमेदवार या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर देतात. ‘‘तुम्ही मला बोलावलं, मग तुम्हीच सांगा.’’ असं बोलून टाकतात. आता सांगा, कोणत्या मुलाखत घेणार्‍याला हे उत्तर आवडेल ? नाहीच आवडत. तसंही मुलाखत म्हणजे उमेदवाराला स्वत:चं मार्केटिंग करण्याची गरज असते. अर्धा-एक तासाच्या कालावधीत तो स्वत:ला मार्केट करत असतो. त्यामुळे संपूर्ण मुलाखत ही मार्केटिंग मिटिंग असते, अशा वेळेस ह्या प्रश्नाने घाबरण्याचं किंवा गों...

प्रिय निसर्गप्रेमी......

इमेज
प्रिय निसर्गप्रेमी, डोंबिवलीच्या समृद्ध निसर्गसंपदेवर आपण सगळ्यांनीच मनापासून प्रेम केलं, करत आहोत. याच निसर्गसंपदेबद्दल जनजागृती व्हावी म्हणून न्यास ट्रस्ट ने निसर्ग भ्रमंती सुरु केली. ट्रेल्स, स्लाईडशोज्, प्रदर्शनं असे उपक्रम सुरु असताना, न्यास च्या हौशी पक्षीनिरीक्षकांचा अभ्यासही सुरु होताच. एच.एस.बी.सी. आणि बी. एन. एच. एस. आयोजित ‘मुंबई बर्ड रेस’ चं मॉडेल समोर होतं. डोंबिवली आणि आसपासच्या प्रदेशात १०० पेक्षा जास्त पक्षीप्रजाती आहेत आणि ह्यालाच कारण तितके अधिवास इथे आहेत, हे लक्षात आलं होतं. या अधिवासांद्दल जनजागृती व्हावी आणि या अधिवासांकडे वळणारे निरीक्षक वाढावेत म्हणून आम्ही  ‘मुंबई बर्ड रेस’ च्या धर्तीवर २०१२ साली डोंबिवली बर्ड रेस सुरु केली. डोंबिवली बर्ड रेस ला फारच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २०१२ आणि त्यानंतरची २ वर्षं बर्ड रेस उत्साहात आणि उत्तम संख्येमध्ये सुरु राहिली. कितीतरी नवे पक्षी निरीक्षक यात तयार झाले. डोंबिवलीच्या अधिवासांद्दल नवी माहिती मिळू लागली. स्पॉटेड इगल, ग्रे हेडेड लॅपविंग, ब्लॅक कॅप्ड किंगफिशर, ऑस्प्रे, असे कितीतरी वेगवेगळे पक्षी या...

मोबाइलला आचारसंहिता लावली तर.??

इमेज
आई-बाबा ऑफिसमधून थकून भागून आले की मुलांनी त्यांना पाणी देणं, जरा मोठी, कळती मुलं असतील तर त्यांनी आई-बाबांना चहा करून देणं. या किती सामान्य गोष्टी आहेत. पण हल्लीची मुलं आई-बाबांनी घरात पाय ठेवला रे ठेवला  की, आधी त्यांच्या हातातील फोन मिळविण्यासाठी त्यांच्यावर एखाद्या पाळतीवर असलेल्या मांजरासारखी झेप घालतात. फोन घेवून काय करतात तर तासन्तास गेम खेळत बसतात. हातातील फोन जसे स्मार्ट झालेत तशी अगदी दुसरी-तिसरीत जाणारी मुलंही असे स्मार्टफोन स्मार्टली खेळू लागली आहेत.   आपल्या कामाचा फोन आपल्या मुलांसाठी खेळण्याचं साधन बनला, याबाबत अनेक आई-बाबांची अजिबात तक्रार नाही. मुलाचं फोनवर गेम खेळणं या गोष्टीकडे अगदी सामान्य बाब किंवा मुलांची आवड म्हणून बघणारे आई-बाबा त्यांच्याही नकळत फोनकडे बेबी-सिटर म्हणून  कधी पाहू लागले, ते त्यांनाही कळलं नाही. फोनवर काय गेमच तर खेळताहेत, म्हणून बिनधास्त राहणार्‍या आई-बाबांना खडबडून जागे करणारे मुलांचे मोबाइलवरचे प्रताप हल्ली उजेडात येऊ लागले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे नेट कनेक्टिव्हिटी असलेल्या या फोनवर नकोत्या वयातील मुलांनी ‘नक...

७२ तासांच्या आत..............

इमेज
अनावधानाने एचआयव्ही पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यास हा व्हायरस आपल्याही शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असते. परंतु अशा परिस्थितीत जर ७२ तासांच्या आत उपचार घेतल्यास एचआयव्हीची लागण होत नाही. त्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे पीईपी (पोस्ट एक्सपोजर प्रॉपीलेक्सी) हे विनामूल्य औषध उपलब्ध केले आहे. एचआयव्ही एड्स हा असाध्य आजार आहे. त्याचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून विविध समाजिक संस्थांसह प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक योजना राबविल्या जातात. एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या रक्त नमुन्यांशी अनावधानाने जर कुणाचा संर्पक आला तर घाबरून न जाता सिव्हिल हॉस्पिटलच्या एआरटी सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या पीईपी औषधाने लागण रोखता येऊ शकते. सिव्हिलमध्ये २००७ पासून पीईपीचे औषध उपलब्ध आहे. सात वर्षांच्या कालखंडात २८० ते ३०० नागरिकांनी या औषधांचा वापर केला आहे. तर २०१४ या वर्षात ३९ लोकांनी या औषधांचा लाभ घेतला आहे. आतापर्यत ज्या नागरिकांनी या औषधाचा वापर केला आहे. त्यात स्त्री आणि पुरूष समप्रमाणात आहेत. पीईपी औषधांचा कोर्स हा २८ दिवसांचा असून त्याचे साईड इफेक्ट फारशे होत नाही. मात्र...

फेसबुक प्रोफाइल खोटं असेल तर...

इमेज
सोशल नेटवर्किंगमुळे सेलिब्रिटीज चाहत्यांच्या अधिक जवळ आले आहेत. मात्र याचाच गैरफायदा घेत, सोशल नेटवर्किंगवर लोकप्रिय व्यक्तींच्या नावाने खोटी प्रोफाइल्स बनवून त्यात गैरप्रकार होण्याचे प्रकार वाढले आहेत. सेलिब्रेटीजनी याविरोधात आवाज उठवण्यास सुरूवात केली असली तरी खोट्या प्रोफाइल्सना आजही लाखोच्या संख्येने हिट्स मिळतायत. अशा बनावट सेलिब्रिटी प्रोफाइल्सपासून आपणही सावध राहणं आवश्यक झालं आहे. कशी ओळखावीत? सर्वसामान्यपणे ख-या सेलिब्रिटीजची पेजेस व्हेरीफाइड असतात. ज्यामध्ये सेलिब्रिटीच्या नावापुढे निळ्या रंगाची, बरोबर असं दर्शवणारी अशी टिक असते, जी फेसबुककडूनच व्हेरीफाइड म्हणून पुरवली जाते. पेजला व्हेरिफाइडची टिक नसेल तर त्या पेजशी ऑफिशिअल वेबसाइट्सच्या लिंक कनेक्ट केलेल्या असतात. खोट्या पेजवरुन शेअर होणारा आशय अनेकदा इंटरनेटवर असणारे फोटो किंवा बातम्यांच्या लिंकच असतात. ख-या प्रोफाइलवरुन अनेकदा सेलिब्रिटीजचे आधी न पहिलेले फोटो आणि खासगी मतं शेअर केली जातात. फेसबुक शिवाय ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरही अनेक सेलिब्रिजची खोटी अकाऊंटस असून त्यांनाही ला...

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.....................

इमेज
हे गणपती बाप्पा सर्वांना यश, धनधान्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभू दे. तुझी अशीच सेवा आमच्या हातून घडत राहू दे. सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा…गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.....................