पक्ष्यांचा वेध आता अॅप वरून
मुंबईसारखे शहरात आणि परिसरात पक्ष्यांच्या तब्बल 250 प्रजाती आढळतात. यामध्ये नेहमी दिसणा-या पक्ष्यांसह काही दुर्मिळ पक्ष्यांचाही समावेश आहे. मात्र मुंबईतील या निसर्गाची आपल्याला नसते. ती माहिती देण्यासाठी काही पक्षी निरिक्षकांनी सात वर्षांच्या अभ्यासानंतर 'वसई बर्डस्' अॅपची निर्मिती केली आहे. सात वर्षांपूर्वी वसईतील कुलदीप चौधरी, अमोल लोपेझ, सचिन मार्टी, लिओनार्ड रिबेलो, प्रज्ञावंत माने, फ्रँकलीन गोन्साल्विस आणि एम.व्ही.भक्त यांनी हौस म्हणून पक्षी निरीक्षणाला सुरूवात केली. छंदातून मिळालेल्या माहितीचे दस्तावेजीकरण सुरू झाले. त्यातूनच या अॅपची कल्पना प्रत्यक्षात आली. मुंबई परिसरातील 250 पक्ष्यांची देणारे हे पहिले अॅप असावे असा पक्षीनिरीक्षकांचा अंदाज आहे.
अॅप कशासाठी
विद्यार्थांना या जैवविविधतेची माहिती व्हावी, त्यायोगे निसर्गाचे संवर्धन व्हावे, स्थानिक पातळीवरील धोक्यांची माहिती व्हावी हा अॅपचा मुख्य उद्देश आहे. पक्ष्यांचे फोटो, त्यांची इंग्रजी नावे, शास्त्रीय नावे, अधिवासाचे ठिकाण, खाद्य आणि आवाज यांचा या अॅपमध्ये समावेश आहे. लवकरच पक्ष्यांची मराठी नावेही समाविष्ट करण्यात येतील. पक्ष्यांसोबतच, 50 प्रजातीची फुलपाखरे, काही सस्तन आणि सरपटणारे प्राणी यांच्याही नोंदी केल्या आहेत.

पुस्तकापेक्षा अॅपला प्राधान्य
पक्षी निरिक्षणासाठी जाताना कोणात्या गोष्टी महत्वाच्या असतात, त्याचीही माहिती आहे. या दस्तावेजांचे रूपांतर पुस्तकात व्हावे अशा सूचनाही करण्यात आली. मात्र पुस्तकापेक्षा अलीकडे स्मार्टफोनचा वापर वाढल्याने लोकजागृतीसाठी हे सोयीस्कर माध्यम ठरेल आणि अवघ्या तीन महिन्यात हे अॅप प्रत्यक्षात आले. हे अॅप सर्वांना वापरण्यासाठी
नि:शुल्क उपलब्ध आहे.वसई परिसरातील सुरूची बाग समुद्रकिनारा, डोंगरी, भुईगाव, अर्नाळा, निर्मळ तलाव या ठिकाणी आढळले दुर्मिळ पक्षी. टिकेलचा पर्णवटवट्या, परजीवी समुद्रचोर, नारिंगी छातीची हारोळी, लगाम सुरय, तिरंदाज, सुंदरबनात आढळणारा वाॅटरकॉक नावाचा दुर्मिळ पक्षी वसईजवळ आढळला होता. हे पक्षी दिसून येतात.

टिप्पण्या