एक नाणे आणि दोन बाजू...

महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. कारण महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतेच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातला लॉकडाउन हा ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत नागरिकांना लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोर पालन केलं नाही तर हा कालावधी वाढूही शकतो. तेव्हा काळजी घ्या आणि कृपया आपल्या घरातच रहा कारण लॉकडाउन वाढविणे किंवा कमी करणे हे आपल्याच हातात आहे हे नेहमी लक्षात ठेवा.आपण स्वतः घरातच लॉक होऊन कोरोनाला डाउन करणे म्हणजेच  लॉकडाउन. एकीकडे करोनाबाधित रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे ‘सारी’ आजाराचेही (सिव्हिअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) सावट निर्माण झाले आहे.  विदर्भात सारीचे सुमारे साडेतीनशे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागातील कर्मचारी हवालदील झाले आहे.
          कोरोनाने शेअर बाजरात धुमाकूळ घातला २० जानेवारीला मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर ४२,२७३ चा उच्चांक मारत १३ मार्चला विक्रीचे दहा टक्क्यांचे खालचे सर्किट लागत २९,३८८ चा नीचांक नोंदविला गेला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने १२,४३० च्या उच्चांकावरून ८,५५५ चा नीचांक नोंदवला. उच्चांकापासून ३० टक्क्यांची घसरण ही कामकाज झालेल्या अवघ्या ४० दिवसांच्या आत कुठेही उसंत, भरीव सुधारणा न होता अल्पावधीत घडली, जे मोठय़ा चिंतेचे कारण आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सगळ्यानाच घरात बसून राहावं लागतं आहे. लॉकडाउनच्या या काळात अनेक वेगळ्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबरोबरच बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चाईल्डलाईन इंडिया हेल्पलाईनकडे ११ दिवसांच्या काळात तब्बल ९२००० तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे घरातच बालकांना शोषणाचा सामना करावा लागत आहे.
          एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात चांगली आणि वाईट बाजू आत्तापर्यंत आपण वाईट बाजूबद्दल लिहिले पण चांगल्या बाजूबद्दल लिहिणे महत्वाचे आहे.समतोल राखणे गरजेचे आहे.25 मार्च ते 14 एप्रिल 2020 म्हणजे 21 दिवसाचा लॉकडाउन आज संपला आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील आहे.टाळेबंदीमुळे वाहनांची वर्दळ थांबली असून त्यामुळे (जल,वायू,ध्वनी) प्रदूषण व आवाज, लोकांचा अवाजवी संचार पूर्णपणे थांबलेला आहे. असे यापूर्वी कधीही घडले नसल्याने मानव वसाहतींजवळ चिमणी, कावळा, बुलबुल, राखी वटवटय़ा, शिंजीर, तांबट, भांगपाडी मैना, साळुंकी, कोकीळ, चिरक या पक्ष्यांची संख्या पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे. पूर्वी हे पक्षी हे शेतशिवारात गेले होते. ते आता पुन्हा घराजवळ परतले आहेत. ग्रामीण भागातही चिमण्यांची संख्या पूर्वीपेक्षा वाढली असून शहरी भागामध्येही जिथे चिमण्या अजिबात दिसत नव्हत्या, आता थोडय़ाफार प्रमाणात चिमण्या दिसू लागल्या आहेत. कावळ्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच जंगली कावळेही दिसू लागले आहेत.हळद्या, निळा कस्तुर, कृष्णथिरथिरा, निखार व नीलिमा हे क्वचितच आढळणारे पक्षी आता अंगणात अधूनमधून सातत्याने हजेरी लावत आहेत, असेही दिसून आले. २१ दिवसांत पुन्हा मानवी वस्तीजवळ परतून आले आहेत. एवढेच नव्हे तर परदेशी पाहुण्या पक्ष्यांचाही मुक्काम वाढला आहे. त्यामुळे आता पक्ष्यांच्या किलबिलाटाने पुन्हा दिवसाची सुरुवात होऊ लागली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

आमची बोली भाषा - अहिराणी

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

मनातलं मन...

एक छोटासा प्रयत्न

अभिनंदन केले पाहिजे

तूच तुझी वैरी

शुभ दिपावली

सहज सुचली म्हणून....