पोस्ट्स

गुरुपौर्णिमा

                                                                        गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा! या दिवशी व्यास-पूजा करण्याची प्रथा आहे.गुरूपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून मानले जाते.सर्व ज्ञानाचा उगम हा व्यासांपासून होतो,अशी भारतीयांची धारणा आहे.त्यामुळे या दिवशी ज्ञानदाता गुरुला वंदन करुन त्यांच्याबद्दलची आदराची भावना व्यक्त केली जाते.

समज गैरसमज …

इमेज
सर्पदंशाच्या उपचारपद्धती आणि सापांविषयी समाजात अनेक शंका व अंधश्रद्धा आहेत. या लेखात आपण त्या विषयी माहिती घेऊ. साप डूख धरतो, असा अनेकांचा समज आहे. पण सापांची स्मरणशक्ती विकसित झालेली नसते. त्यामुळे साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे तो डूख धरत नाही. नागाला नागपंचमीच्या दिवशी दूध पाजण्याचा प्रयत्न अनेक करतात. पण दूध हे सस्तन प्राण्यांचे अन्न आहे. साप हा सस्तन प्राणी नाही. मग तो दूध कसा पिणार? हरणटोळ या जातीचा साप माणसाचा टाळू फोडतो, असा ग्रामीण भागात अनेकांचा समज आहे. पण माणसाच्या कवटीचे हाड कमालीचे कठीण असते. डोक्याची शस्त्रक्रिया करायची असेल तर डॉक्टरांना अनेक धारदार, कठीण साधने वापरावी लागतात. हरणटोळ हा साप तर अतिशय नाजूक असतो. मग तो टाळू कसा काय फोडणार? साधारणपणे या जातीचे साप झाडावर असतात आणि झाडावरून ते दंश मारतात तेव्हा माणसाचे डोके या सापाच्या तोंडाजवळ असते. त्यामुळे हा गैरसमज पसरला असावा. सापांना केवडा तसेच रातराणीचा सुगंध आवडतो, असाही समाज असतो पण केवड्याचे बन काटेरी असते. केवड्याचे कणीस खाण्यासाठी उंदीर येत असतात. त्या जागा सापाच्या वास्तव्यास अ...

डॉक्टर ! तुम्हीसुद्धा.....

इमेज
गर्भलिंग चाचण्या करताना कारवाईच्या कचाट्यात अडकू नये , यासाठी सोनोग्राफी सेंटरमध्ये गणपती व लक्ष्मीचे फोटो ठेवले जातात . मुलगा असल्यास गणपतीच्या फोटोकडे आणि मुलगी असल्यास लक्ष्मीच्या फोटोकडे केवळ बोट दाखवले जाते . त्याशिवाय सांकेतिक भाषेत इंग्रजीत मंडे आणि फ्रायडे असे सांगितले जाते . मंडेच्या इंग्रजी स्पेलिंगची सुरुवात ' एम ' म्हणजे मेल आणि फ्रायडेची सुरवात ' एफ ' ने होते . ' एफ ' म्हणजे फिमेल असे सांकेतिक भाषेत सांगितले जाते . प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचण्या केल्याच्या आरोपावरून आरोग्य विभागाने राज्यातील ६० डॉक्टर व गर्भवती महिलांच्या पाच नातेवाईकांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे . त्यापैकी बहुतांश डॉक्टर पुणे , धुळे व जळगावमधील आहेत . दरम्यान , गुप्तपणे अशा चाचण्या करणाऱ्या डॉक्टरांवर गुप्तचरांमार्फत नजर ठेवण्यात येत आहे . गर्भलिंग चाचण्यांप्रकरणी दोषी डॉक्टरांवर कारवाई करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे . त्यासाठी व्हिजिलन्स व इतर गुप्तचर ...

देशात 'अच्छे दिन' येणार.....

इमेज
देशात ' अच्छे दिन ' येणार , असा विश्वास जनतेला देऊन पंतप्रधानपदी विराजमान होण्यास सज्ज झालेले नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या आदल्याच दिवशी भारताला एक चांगली बातमी मिळाली आहे . पाकिस्ताननं आज भारताच्या १५१ भारतीय कैद्यांची सुटका केली आहे . भारत - पाक मैत्रीच्या नव्या अध्यायाचा हा शुभारंभ ठरावा , अशी भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होतेय . दुसरीकडे , श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांना सोडण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी दिले आहेत . पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भाजपनं नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं होतं . ते स्वीकारून शरीफ उद्या मोदींच्या शपथविधीला हजर राहणार आहेत . त्यानंतर २७ मे रोजी द्विपक्षीय संबंधांबाबत भारत - पाकमध्ये चर्चाही होणार आहे . या सर्व घडामोडींचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय . दोन्ही देशांना ' अमन की आशा ' असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत . या पार्श्वभूमीवर , पाकिस्ताननं १५१ भारतीय...

अंधश्रद्धेच्या आहारी

इमेज
  अंधश्रद्धेच्या आहारी जात मुंबईतील मुलीशी जमलेले लग्न मोडून पुन्हा गावात जाऊन अल्पवयीन विद्यार्थिनीशी विवाह करण्याचा एका सोने व्यापार् ‍ याचा डाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे . मात्र आता या व्यापार् ‍ याने तिसर् ‍ या मुलीशी लग्नाचा घाट घातल्याची माहिती हाती आल्याने याविरोधात आपण दंड थोपटणार असल्याचे समितीच्या वंदना शिंदे यांनी सांगितले . भांडुप येथे राहणार् ‍ या आणि वांद्रे येथे सोन्याचे दुकान असणार् ‍ या एका सराफाने मुंबईतील एका मुलीशी विवाहाची बोलणी सुरू केली होती . मात्र अंधश्रद्धेच्या अधीन गेलेल्या त्याच्या आईवडिलांनी दोघांची कुंडली एका मांत्रिकाला दाखविली . त्यात त्यांचे ‘ गुण ’ जुळत नसल्याचे मांत्रिकाने सांगताच जमत आलेले लग्न व्यापार् ‍ याने मोडले . म्हसवडजवळील रांजनी हे या व्यापार् ‍ याचे गाव आहे . आता या व्यापार् ‍ याने आणि त्याच्या आईवडिलांनी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील धुळदेव येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी विव...