विंचूविंचू हा अतिशय चिवट प्राणी आहे. कडाक्याची थंडी आणि अतिउष्णता अशा दोन्ही टोकांच्या वातावरणात विंचू तग धरून राहातो. त्याच्या लपण्याच्या जागा, लहान आकार, निसर्गाशी जुळता रंग चपळ हालचाल यामुळे विंचवाला सहजासहजी मारणे शक्य नसते. सतत दोन दिवसांपर्यंत पाण्यात बुडवून ठेवला तरी जो जिवंत राहू शकतो. जिवंत राहण्यासाठी या बाबी निसर्गाने विंचवाला दिलेल्या आहेत. ग्रीनलंड अंटार्क्टिका वगळता जगात इतर ठिकाणी विंचू कमी-जास्त प्रमाणात आढळतात.

काळा लाल विंचू

काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो. काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळतो. लाल विंचू मुख्यतः कोकणात सापडतो. हा जास्त घातक असून त्याच्या दंशामुळे अनेकांना प्राणांना मुकावे लागले आहे. भारतात १२० प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वांत मोठा विंचू सुमारे अठरा सेंटिमीटर लांबीचा असतो. आर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी दोन जाती महाराष्ट्रात आहेत.

कोकणातला लाल विंचू (लाल इंगळी) बराच धोकादायक असतो. लाल विंचवाचे लॅटिन नाव (mesobuthus tamulus) असे आहे. या विंचवाच्या विषावर उतारा (अँटी सिरम) हे मुंबईच्या हाफकीन इन्स्टिट्युटने उत्पादन केलेले प्रभावी औषध आहे.

विंचवाचे वास्तव्य माहिती

विंचावाचे वास्तव बहुधा घरांची कौले, घराची छते, जुने कपडे, काढून ठेवलेल्या चपला, बूट, अडगळ अशा ठिकाणी असते. अनेकदा छतातून रात्री विंचू खाली पडतात. अंधारात स्वरंसक्षणाचा प्रयत्न करताना ते दंश करतात. यासाठी कौलारू छत असेल तर त्याखाली लाकडाचे अजून एक स्तराचे छत असणे आवश्यक असते. शेतीमध्ये काम करताना हातात जाड हातमोजे वापरणे योग्य असते. गुंडाळून ठेवलेले पांघरूण झटकून मग झोपावे. कोकण म्हणजे विंचू आणि सापांचा प्रदेश असा सार्वत्रिक समज आहे. कारण त्यांच्यासाठी तेथे अनुकूल नैसर्गिक रचना आणि वातावरण आहे. विंचवाच्या जगात असंख्य जाती असल्या तरी लाल रंगाचा विंचू सर्वांत जास्त विषारी असतो. बाकी अनेक जातींचे विंचू प्राणघातक ठरत नाही. विंचू भुकेला नसेल, डिवचलेला नसेल तर त्याचा दंश कमी विषारी असतो. त्याचप्रमाणे तो शरीराच्या कोणत्या भागावर आणि कितीवेळा चावला आहे, त्याचे विष थेट रक्तवाहिन्यांमध्ये गेले आहे किंवा नाही इत्यादी बाबींवरही दंशाची दाहकता अवलंबून असते. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात अशा प्रकारचे विषारी लाल विंचू बऱ्याच प्रमाणात आढळतात.
मे महिन्याच्या सुरवातीला उष्णता या महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व पाऊस पडतो. त्यामुळे विंचवाला घराबाहेर पडणे भाग पडते. तर ऑक्टोबर महिन्यात भात कापणी झालेली असते. त्यामुळे शेतातील फटी, खबदाडीमध्ये लपायला त्याला जागा उरत नाही. अशाप्रकारे उघडे पडलेले विंचू फिरताना सहज आढळतात. त्यामुळे चावण्याचे प्रमाण स्वाभाविकपणे या काळात जास्त दिसून येते.

लक्षणे आणि वेदना

लाल रंगाचा विषारी विंचू चावल्यामुळे रुग्णाला जीवघेण्या वेदना होतातच, शिवाय घामाच्या धारा लागतात. दंशामुळे शारिरीक वेदना, घाम येणे, बधिरता येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशी लक्षणे दिसतात. त्याशिवाय शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्याचा परिणाम हृदय मेंदूच्या कामावर होतो. परिणामी रक्ताभिसरणात अडथळा येतो. अशा प्रकारच्या विंचूदंशामुळे शरीरातील संप्रेरक शक्तीचा प्रभाव कमी होतो. हृदयविकाराचा झटका आल्यासारखी स्थिती येते. विंचूदंश लहानांपासून थोरांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. त्याचे परिणामही त्या त्या स्थितीनुसार कमी-अधिक दिसू शकतात. त्यातही लहान मुलांबाबत मज्जासंस्थेत दोष निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच शरीरातील संप्रेरकामुळे हा फटका बसत असल्याने अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. विंचूदंशावरील उपचाराबाब महत्त्वाची अडचण म्हणजे हे प्रकार ग्रामीण भागात जास्त प्रमाणात घडतात. अनेक ठिकाणी पुरेशा वैद्यकीय सोयी असतात. पण विंचूदंश विरोधी लस नसते. जर ग्रामपंचायत स्थानिक डॉक्टर यांच्याकडे विंचूदंश विरोधी लस नसल्यास स्थानिक डॉक्टर त्यांचे ज्ञान अनुभव यांच्या आधारे उपचार करतात. मात्र, रुग्णाला जास्त घाम येत राहिल्यास सुसज्ज वैद्यकीय उपचार असलेल्या ठिकाणी दाखल करणे योग्य ठरते.

विष निकामी

विंचूदंशावर उपचार म्हणून विंचू प्रतिविषजल हे औषध हाफकीनने १९९७मध्ये विकसित केले. हे औषध विषावर प्रतिहल्ला करून त्याला निकामी करत असल्याने ते प्रभावी ठरते. विष निकामी झाल्याने शरीरात निर्माण होणारा ऑड्रिनलिनचा स्राव थांबतो. हे ऑड्रिनलिन रक्तात पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ राहात नसल्याने रुग्ण दोन ते चार तासांत बरा होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

त्या आठवणी...

बॅड पॅच

मनातलं मन...

सहज सुचली म्हणून....

अभिनंदन केले पाहिजे

मोठे रॅकेट...