झिका विषाणूबाबत भारतातही सतर्कता
नवजात बालकांच्या मेंदूची वाढ खुंटविणाऱ्या झिका या विषाणूचा प्रसार दक्षिण अमेरिका खंडामध्ये सध्या फार वेगाने होत आहे. या विषाणूला वेळीच आवर नाही घातला, तर वर्षअखेरीपर्यंत तब्बल चाळीस लाख नागरिकांना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या समस्येचा सामना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक फेब्रुवारीला तातडीची बैठकही बोलाविली आहे. जन्मजात होणाऱ्या या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः मातेच्या गर्भातच होतो. या रोगाला मायक्रोसेफॅली म्हणतात. इतर व्यक्तींनाही हा रोग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, या विषाणूने धोक्याची पातळी ओलांडली आहे. इबोलाप्रमाणेच या विषाणूबाबतही जागतिक पातळीवर धोक्याचा इशारा जारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. 2014 ला ब्राझीलमध्ये झालेल्या विश्चचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आलेल्या विदेशी नागरिकांकडूनच हा विषाणू दक्षिण अमेरिकेत आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्राझीलमध्येच या विषाणूचा प्रसार अधिक असल्याने जन्माला येणाऱ्या पिढीतील बहुतांश जणांना हा रोग होण्याची भीती व्यक्त होत आहे. काय आहे झि...