नाॅलेज ची किंमत

बँकेवरील दरोडा
हॉंकॉंगमध्ये एका बँकेवर
दरोडा पडला. सगळ्यांनी
मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून रहा. लक्षात ठेवा पैसा सरकारचा
आहे पण जीव तुमचा आहे.’
दरोडेखारांनी ओरडून सांगताच सर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.याला म्हणतात ‘माईंड
चेन्जिंग कन्सेप्ट’ (Mind
Changing Concept) म्हणजेच माणसांच्या सर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याची किमया.त्यातील एक महिला ‘सेक्सी’ पद्धतीने आडवी पडली होती.एक दरोडेखोर तिला ओरडून म्हणाला, ‘मॅडम! जरा सभ्यपणे वागा. हा दरोडा आहे, बलात्कार नाही.’ याला म्हणतात व्यावसायीक रहाणे (Being professional) आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.
   दरोडा टाकल्यावर दरोडेखोर  लूट घेऊन घरी आले. त्यातला ज्युनिअर दरोडेखोर,जो एम.बी.ए. होता तो 6 वी पर्यंत शिकलेल्या सिनियर दरोडेखोराला म्हणाला.,
‘चला आता आपण पैसे मोजायला लागुया!’ त्यावर सिनिअर दरोडेखोर म्हणाला,‘वेडा आहेस की काय? हे पैसे मोजायला कित्येक तास लागतील. जरा दम धर. रात्री टी. व्ही.वरच्या बातम्या बघ. तुला
आपोआपच कळेल की आपण किती लाखांचा दरोडा घातला आहे ते.
’याला अनुभव म्हणजेच
‘एक्सपिरिअन्स’ (Experience) असे म्हणतात. हल्ली कागदी डिगर्यां पेक्षा अनुभव जास्त
महत्वाचा झाला आहे.
दरोडेखोर बँकेतून निघून
गेल्यावर बँक मॅनेजर सुपरवायझरला म्हणाला,
‘ताबडतोब पोलिसांना फोन
कर!’ सुपरवायझर म्हणाला ,
‘थोडे थांबा साहेब! आपण आधीच बँकेच्या 70 लाख डॉलर्सवर डल्ला मारला आहे. त्यात अजून 10 लाख डॉलर्सची भर घालूया व मग पोलिसांना बोलवूया!’ याला म्हणतात ‘लाटेबरोबर पोहणे’(Swim with the tide). म्हणजेच संकटाचे रुपांतर संधीत करून स्वतःचा स्वार्थ साधून घेणे.
सुपरवायझर म्हणाला, ‘जर
दर महिन्यात असा दरोडा
पडला तर कार मजा येईल!’
याला म्हणतात ‘प्रॉयॉरिटी
बदलणे’ (Changing priority). कारण ‘पर्सनल हॅपिनेस’ हा तुमच्या ‘जॉब’ पेक्षा जास्त महत्वाचा असतो.दुसर्याह दिवशी टी. व्ही. वर  बातमी झळकली की बँकेवर 100 लाख डॉलर्सचा दरोडा पडला. पण ही बातमी ऐकून दरोडेखोर मात्र हैराण झाले.कारण त्यांनी आणलेली
कॅश परत परत मोजली. पण ती फक्त 20 लाख डॉलर्सच निघाली.
मग 80 लाख डॉलर्स कुठे गेले?
खरी मेख काय आहे ते
सिनियर दरोडेखोराच्या बरोबर लक्षात आहे.तो वैतागून म्हणाला, ‘आपण जिवावर उदार होऊन
दरोडा टाकला पण आपल्याला फक्त 20 लाख डॉलर्सच मिळाले. पण त्या बँक मॅनेजरने मात्र काहिही न करता 80लाख डॉलर्स लाटले.खरे आहे माणसाने शिकले पाहीजे. नुसतेच दरोडेखोर न होता ‘सुशिक्षीत दरोडेखोर’ व्हायला पाहीजे.’याला म्हणतात ‘ज्ञान’
म्हणजेच 'नॉलेज’ (Knowledge) ज्याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त
असते. तुमचे सोने नाणे लोक पळवून नेऊ शकतात पण तुमचे ‘नॉलेज’ कुणीच पळवून नेऊ शकत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...