गणपती बाप्पा मोरया...




गणपती बाप्पा मोरया
लवकरच घरी आणुया
घरीच सूरक्षित राहूया
त्याचे स्वागत करूया
कोरोना कसा पळतो ते पाहूया
डोळ्यात आपल्या साठवूया
आणि मग बाहेर पडूया
जशी व्यवसायात प्रगती करूया
तशीच नोकरीत प्रमोशन घेऊया
सुखाने,समाधानाने जगूया...
एवढेच बोलून संपवूया
चला आत 2021 कसे असेल ते पाहूया.

- विनायक पवार


सहज सुचली म्हणून....



तुझ्याच हाती सर्व काही.
माझ्या हातात काहीच नाही.
तुझ्या हाती माझा आणि आईवडीलांचा जीव माझ्याच बँकेत तुझी फीक्स आणि ठेव
तूच माझी होम मीनीस्टर
तूच माझी फायनांस मीनीस्टर
तूच मूलाबाळांसाठी प्रेमाची माऊली
जशी उन्हाळ्यात हवीहवीशी वाटणारी सावली
तू वजा होता मी शून्य शून्य
तू बेरीज होता मी धन्य धन्य
माझ्याकडून छोटासा हा एक प्रयत्न
पूर्ण होतील आपले इच्छा आणि स्वप्न
चलातर मग लॉकडाऊन मध्ये घेऊन
यळकोट जय मल्हार जेजूरीचे दर्शन....

विनायक पवार

भूतकाळात डोकावताना...

‘करोना’नं केलेली दीर्घकाळची टाळेबंदी आणि संचारबंदी ही बहुतेकांच्या आयुष्यातली पहिलीच घटना असली तरी वेगळ्या प्रकारच्या संकटांना, भीतीला किंवा वेगळ्या प्रकारच्या टाळेबंदीला आधीच्या पिढीने तोंड दिलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भारत-पाक आणि भारत-चीन युद्धाच्या प्रसंगी अनेकांनी संचारबंदी, ब्लॅकआउट अनुभवले आहेत. तर पूर, भूकंप इतकंच नव्हे तर प्लेगसारख्या साथीनं अनेक गोष्टी दाखवल्या आणि शिकवल्यादेखील.

मायाजाल

             
              कार्ड क्लोनिंग कसे होते

एटीएम मशीन मध्ये ज्या ठिकाणी डेबिट कार्ड आत टाकले जाते त्या ठिकाणी स्किमर बसविले जातात कार्ड आत टाकताच त्यामागील मॅग्नेटिक स्ट्रिप  स्किमरमध्ये स्कॅन होते एटीएम मशीनवरील की - बोर्डच्या वरील बाजूस चुपा कॅमेरा बसविला जातो. या कॅमेरामध्ये कार्ड धारकाने दाबलेला पिन नंबर सेव्ह होतो स्किमरवर  स्कॅन झालेल्या मॅग्नेटिक स्ट्रिपची भामटे तशाच प्रकारच्या अन्य स्ट्रिपवर प्रिंट आऊट काढतात आणि डुप्लिकेट कार्ड तयार करून त्याचा वापर करतात  सेव्ह झालेला पिन नंबर घेऊन डुप्लिकेट कार्ड वापरेलले जाते अशा च प्रकारे दुकान,हॉटेल, मॉल, कॉफी शॉप मध्ये स्वाईप मशीनद्वारे डेटाचोरी करून डुप्लिकेट कार्ड द्वारे एटीएम सेंटर मधून तुमचे पैसे काढले जातात
           सायबर पोलीस सेल म्हणजे काय?

२००० साली माहिती-तंत्रज्ञान आयटी कायद्याची निर्मिती झाली.त्याच वर्षी देशभरातल्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन सेल स्थापन करण्यात आले. त्यानुसार १८ डिसेंबर २००० रोजी मुंबई पोलिसांचा सायबर सेल कार्यान्वित झाला हा सेल गुन्हेशाखेच्या अंतर्गत काम करतोय. मुंबई पोलीस आयक्तालयात या सायबर सेलच सुसज्ज  कार्यालय आहे. इंटरनेटच्या माध्यमातून घडणारा प्रत्येक गुन्हा या सेलकाढून तपासला जातो. त्यासाठी या सेल मध्ये तज्ञ,तज्ज्ञ मंडळी प्रशिक्षित अधिकारीवर्ग आहे.

२००९ सालि मुबई पोलिसांनी वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस ठाण्याची स्थापना केली.सायबर पोलिस आधी तक्रारीतली तथ्यता पडताळतात.त्यानंतर आरोपीने वापरले ले ईमेल अकाउन्टचा पाथ,आयपी,आयएसपी   शोधून प्रत्यक्ष आरोपीपर्यंत पोहचतात.त्याने ज्या कॉम्प्युटरमधून गुन्हा केला आहे तो ताब्यात घेऊन त्यातून पुरावे गोळा करतात.हा संपूर्ण तपास अत्यंत गोपनीयपणे केला जातो.

इंटरनेट किंवा मोबइलच्या माध्यमातून आर्थिक फसवूणूक,बदनामी,अश्लील मजकूर-फोटो क्लीप, धमक्या यापैकी कोणत्याही तक्रारीसाठी थेट सायबर सेल कडे तक्रार करता येऊ शकते.
सायबर सेलशी संपर्क 
 cybercell.mumbai@mahapolice.gov.in

"जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी"अर्थात योग्य विचाराने पैसा कमवावा आणि निरपेक्ष वृत्तीने तो खर्च करावा.संत तुकाराम महाराजांनी पाचशे वर्षापूर्वी आर्थिक नियोजनाचा गुरमंत्र अवघ्या आठ शब्दात सांगून गेले आहेत.काय ती दुरदृष्टी?कारण तेव्हापासून पाचशे वर्षानंतर या भूमिवर गुदगुल्या करून हसवून मारणारे 'क्रेडिट कार्ड' नावाचे एक 'अस्वल' धुमाकूळ घालणार आहे आणि घालत आहे.हे तेव्हाच त्यांना दिसत असले पाहिजे! नको असलेली खरेदीसुध्दा करून घरी परतलो असतो, कारण क्रेडिट कार्ड आज फक्त खरेदी करायची आणि एक रूपया पण व्याज न देता चाळीस दिवसात कधीही पैसे भरू शकता आणि इथेच अनावश्यक खरेदीला प्रारंभ होतो.

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मातृदिन.आज, १० मे रोजी भारतासह जगभरात 'मातृदिन' उत्साहात साजरा केला जात आहे. आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस. खरंतर आईवरील प्रेम दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? किंवा एकच दिवस का? तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. पण अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. मातृदिना निमित्त पाहुया आईबद्दलचे थोरामोठ्यांचे विचार...

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी
औषधावर दिलेली लिमलेटची गोळी
आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा
शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा
आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात
आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र
आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही

  • ठेच कान्हूला लागली
  • यशोदेच्या डोळा पाणी
  • राम ठुमकत चाले
  • कौसल्येच्या गळा पाणी,
  • देव झाला तान्हुला ग
  • कुशीत तू घ्याया,
  • तिथे आहेस तू आई  
  • जिथे आहे माया!!’

  • ‘चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई
  • गोठय़ात वासरांना या चाटतात गाई,
  • वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही
  • पाहून अंतरात्मा व्याकूळ मात्र होई,
  • नोहेचि हाक माते मारी कुणी कुठारी
  • स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!’

आईला सन्मान देणारया मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस आपल्या आईवर खूप प्रेम करायची. तिने ना लग्न केले ना मुले जन्माला घातली. आईचा मृत्यू झाल्यावर तिने या दिवसाची सुरुवात केली. मग हळू हळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.

मेच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मातृदिन ?

९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला. ज्यामध्ये लिहिले होते की, मेच्या दुसऱ्या रविवारी मदर्ड डे साजरा केला जाईल. त्यानंतर मातृदिनअमेरिकासह इतर देशांमध्ये याचदिवशी साजरा केला जाऊ लागला.

द टेस्ट ऑफ इंडिया...

मुंबई म्हणजे न झोपणारं शहर.अगदी सुरूवातीसूनच ते तसं होतं.आताची 'नाइट लाइफ',तेव्हा नव्हती.डिस्को,पबमधील दणदणाटा ऐवजी रात्री कारखाने आणि कापड गिरण्यातील यंत्रांची रात्रपाळीतील धडपड सुरू असायची. सकाळचा भोंगा वाजला की सगळ्याच मुंबईला जाग येऊ लागे.शाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या मुलांच्या जोडीला लगबग असे कामावर जाण्यार् या मोठया मंडळींचीही. त्यासाठी पहिली धाव घेतली जाई नाक्यावरच्या दूधकेंद्राकडे.

सन १९५० पासून जुन्या आठवणीच्या कप्यात आजही एक आठवण घर करून आहे.ती म्हणजे दूध केंद्र. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या अनेक ब्रँड चं दूध सर्रास उपलब्ध आहे. अमूल,गोकूळ,वारणा ही आवडते ब्रँड आहेतच. हायफाय मॉल मध्ये गेलात तर अगदी 'इम्पोर्टेड' दूध सहज मिळतात.आजच्या पिढीला काहीही अप्रूप नाही. दुधाची गाडी आली की मुंबई खऱ्या अर्थानं जागी व्हायची. सकाळच्या शांत प्रहरी काचेच्या बाटल्यांचा नाद कानावर पडायचा घाई गबडीत एखादी बाटली फुटली की रस्ता दुधी रंगाचा होऊन जायचा.सूर्य उगवतो येईपर्यंत दूध केंद्रावरील रांगा कमी व्हायच्या.घरी नेलेल्या बाटलीच्या बुचाला आतून असलेला स्निग्धपणा लहान मुलं आवडीन चाटून घ्यायची.बदलत्या काळात ही केंद्रं ओस पडू लागली.पण आजही बाटल्यांचा नाद कानात घुमत आहे. केंद्रावरून दुधाच्या बाटल्या आणण्याचं काम बऱ्याचदा घरातल्या ज्येष्ठांना करावं लागायचं असे दुधाच्या बाटल्या घरी आल्यावर त्यांच्यावर पहिला हक्क बच्चेकंपनीचा.बाटलीचं बूच उघडून थंडगार मलईचा थर चाटण्यात मजा असायची. जणू आइस्क्रीमच.बाटली उघडली की दुधाची शुभ्र धार पातेल्यात पडे चहा बरोबर पोळी बिस्कीटं किवा खारी बटर खाऊन मुलं शाळेसाठी आणि मोठी मंडळी कामासाठी रवाना होत.

त्या काळी मुंबईत धान्य आणि दूधाची प्रचंड टंचाई जाणवत असे त्यामुळे सरकारने तेव्हा धान्य आणि दूधाचं रेशनिंग सुरू केलं होतं.१९५१ मध्ये आरेमध्ये आशियातील पहिली दुग्धशाला विभाग सन १९५८ मध्ये स्थापन करण्यात आला.राज्यात ३८ दुग्धशाळा आणि ८१ शीतकरण केंद्राची स्थापना करण्यात आली.त्यापूर्वी हे दूध काचेच्या जाड बाटल्यांतून वितरित केले जाई 'होल' आणि 'टोन्ड' असे त्याचे दोन प्रकार होते. 'होल' दूध अधिक मलईदार आणि महाग त्यामुळे ते सदन कुटुंबला घेणं परवडे मध्यम वर्गीय आणि गरीब कुटुंबामध्ये तर स्वस्त 'टोन्ड' दूध घेतले जाई. 'होल' दुधाच्या बाटलीचे बूच निळ असे आणि 'टोन्ड' दुधाच्या बाटलीचं पांढरं नंतर 'स्टँडर्ड' हा आणखी प्रकार सुरू झाला.त्या दुधाच्या बाटलीचं बूच नारंगी रंगाचं असे. प्रत्येक कुटंबातील लोकांना ठराविक प्रमाणात च दूध मिळावं म्हणून सरकारी कार्ड असतं त्या कार्डवर कुटंबप्रमुखाचे नाव आणि त्याचा दूध कोट्याची नोंद असे.अगदी सुरवातीला पुठ्याचे कार्ड मिळायचे.नंतर प्लास्टिकचं कार्ड आले आणि त्यानंतर अल्युमिनियमच.त्या काळी पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी पोषक आहार म्हणून चिक्की, एखादं फळ आणि सरकारी दूध रोज मिळेल याची व्यवस्था होती. पांढऱ्या बुच्याच्या बाटलीतलं पाव लिटर दूध विद्यार्थ्यांला मधल्या सुट्टीत प्यायला मिळे.

अल्बम


तणावमुक्त जगण्यासाठी रोज किमान दोन तास स्मार्टफोन, संगणक, दूरचित्रवाणी यांसारख्या पडद्यांपासून लांब राहा; थोडक्यात कायतर  ‘डिजिटल पथ्या’चे पालन करा. त्याऐवजी वाचन, छंद, संगीत,लेखन यांपैकी एखाद्या गोष्टीत मन गुंतवा तेवढाच बदल असे म्हणतात बदल हा सृष्टीचा,निसर्गाचा नियम आहे. व. पु. काळे यांनी देखील म्हटले आहे आपल्या वयाला हरवायचे असेल तर आपल्यातील छंद जिवंत ठेवायला पाहिजे.असाच माझा एक छंद म्हणजे पुस्तक वाचन जुनी पुस्तक चाळता चाळता मला लोकसत्ता वृत्तपत्राने प्रकाशीत केलेले "लोकसत्ता अर्थब्रह्म" दिसले. पुर्वी डिग्रीला असताना वाचलेली. पण अनुभव सारखे नव्हते. पहिल्यावेळी वाचतानाचा अनुभव आणि यावेळी वाचतानाचा अनुभव काही वेगळाच होता. पहिल्या वेळी वाचताना आपण कुठलं रटाळ पुस्तक वाचतोय असं वाटतं होतं... तेंव्हा येवढी समज नव्हती किंबहूना आयुष्यातली पहिले पुस्तक असल्यामुळं असेलही कदाचित म्हणजे पुस्तक तेचं पण अनुभव मात्र वेगळा.

मुखपृष्ठावरील चित्रे पाहूनच मी पुस्तक विकत घेतले होते.त्यांचा याआधीही 'लोकप्रभा' हा विशेषांक प्रसिद्ध झालेला आहे.आणि त्यास वाचक प्रतिसादही खूप मिळाला आहे.'लोकसत्ता अर्थब्रह्म' या विशेषांका मध्ये एकूण 22 लेख आहेत आणि यामधील बहुतांशी लेख शेअर मार्केट,गुंतवणूक वर आधारित आहेत यात आयुर्विमा,एसआयपी आणि विमाकवच, ईच्छापत्र,सेवानिवृत्ती कधी व केव्हा घ्यायची यांचे  सुरेख वर्णन करण्यात आलं आहे.गुंतवणूक दाराची अवस्था सध्या चक्रव्यूहातील अभिमन्यूप्रमाणे झाली आहे.आज जगा, मजा करा,उद्या कोणी बघितलंय आणि म्हणून बिनधास्त खर्च अशांना मखमली चिमटे घेऊन बचतीचे महत्व पटवून देणारा हा अंक असणार आहे. 'माणसाला एक मासा दिला तर आपण त्याची एक दिवसाची भूक भागवू शकतो,पण त्याला मासा पकडायला शिकवला तर त्याची आयुष्यभराची भुकेची तरतूद करू शकतो' चागल्या संकल्पनांचा लक्षवेधक वापर लेखकांनी केला आहे. गुंतवणूकीची रक्कम ही खर्चानंतर उरलेली रक्कम नसावी तुमच्या खर्चाची रक्कम गुंतवणूकीनंतर उरलेली रक्कम असावी.अवघड वाटणार् या गोष्टीचा अर्थ अतिशय सोप्या भाषेत आणि छोटी छोटी उदाहरणं देऊन समजावून सांगितला आहे.शेअर बाजार फक्त ह्रतिक वर आहे HRITIK म्हणजे  H - Hdfc/Hul  
R - Reliance I - Itc T - Tcs  I - Infosys 
K - Kotak. कशाची उपमा देऊन सांगितलं तर चांगल्या रितीने समजतं आणि आवडतं याच कल्पनेचा वापर यात उत्तमरित्या केला आहे. "मोठे पैसे कमवायला आणि गोमटी फळे चाखायला सातत्याने केलेली छोटी गुंतवणूक ही खूप महत्वाची ठरते " संपादक श्री गिरीश कुबेर यांनी लिहिलेले संपादकीयमध्ये 'नवा संकल्प' आणि 'नवा अर्थ' खुप छान मांडले आहे त्यात संकल्प अधिक आणि अर्थ देखील मुबलक आहे ते शोधून वाचकांपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न तसेच गुंतवणूकीची बेरीज न होता गुणाकार कसा होईल हे विशद करणारा हा विशेषांक असणार आहे. मुखपृष्ठ सुशांत ऐनापुरे यांनी छान बनवले असून अंतरंगमध्ये काय असणार हे दर्शविण्यात आले आहे त्यात बचत,शिक्षण, गोल्ड,गुंतवणूक, करन्सि तसेच प्रॉपर्टी दाखवण्यात आले असून हे पुस्तक जसे जसे वाचाल तसे तसे तुम्ही गुंतवणूकीची एक एक सीडी चढाल अगदी पहिल्या पगार पासून ते सेवानिवृत्ती योजनेसाठी शिस्तबद्ध आणि नियमितपणे गुंतवणूक कशी व केव्हा करावी याबाबत खूप चांगली उपयुक्त माहिती यात देण्यात आली आहे.

1)अजय वाळिंब (लेखक - भांडवली बाजार विश्लेषक)
2)डॉक्टर मेघा शेट्ये (लेखिका - कायदा जाणणारी)
3)नीलेश तावडे (लेखक - 20 वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत)
4)कौस्तुभ जोशी (लेखक - अर्थशास्त्राचे प्राध्यापक)
5)तृप्ती राणे (लेखिका - सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत)
अशी अनुभवी लेखकांची फौज आहे.

1)पूर्वग्रह समजूत आणि गुंतवणूकीचे वर्तन
2)आयुर्विमा असायलाच हवा!
3)उद्दिष्टानुसार गुंतवणूक आणि तुमची दिशा
4)पोर्टफोलियोची स्वच्छता आणि पुनर्बांधणी
5)बाय-बॅक लाभ आणि तोटे आणि एसआयपी
असे हे दर्जेदार लेख वाचण्यासारखे आहेत.

पुस्तकाचे नाव - लोकसत्ता अर्थब्रह्म
संपादक - गिरीश कुबेर
मुखपृष्ठ - सुशांत ऐनापुरे
मांडणी/सजावट - संदेश पाटील
किंमत - 60/-



न संपणारा टिवटिवाट....

करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशी मागणी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने करून पुन्हा टिवटिव करण्यास सुरवात केली असून त्याला पाकिस्तानच्या काही  क्रिकेटपटूंनी पाठिंबाही दिला.आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधलं द्वंद्व प्रत्येकाने अनुभवलं आहे. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत. मात्र प्रत्येक भारत-पाक सामन्याआधी दोन्ही देशांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. जो संघ सामना जिंकतो त्यानंतर पुढचे काही दिवस सोशल मीडियावर चाहतावर्ग धुमाकूळ घालतो.

भारताने पाकिस्तानसाठी व्हेंटिलेटर तयार करावेत, तसेच करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशा मागण्या जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केल्या होत्या. त्यामुळे त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. भारत-पाक यांच्यात ३ सामन्यांची मालिका खेळवण्याचा विचार मांडला होता. यातून मिळणारं उत्पन्न हे करोनाविरुद्ध लढ्यात दोन्ही देश वापरतील असाही पर्याय शोएब अख्तरने सुचवला होता. मात्र भारताला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार कपिल देव यांनी शोएबच्या या कल्पनेला पूर्णपणे विरोध केला आहे.सध्या खेळ हा देशापेक्षा मोठा होऊ शकत नाही. सध्या गरजू व्यक्ती, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस यांची काळजी घेणं हे आपलं काम आहे, तुम्ही भावनिक होऊन म्हणू शकता की भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळली जायला हवी. पण सध्या सामने भरवणे ही प्राथमिकता मुळीच नाहीये. जर तुम्हाला पैसेच हवे असतील, तर तुम्ही सीमेपलीकडून भारताविरोधात करत असलेला दहशतवाद थांबवा आणि तो पैसा शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी वापरा असे रोखठोक मत कपिल देव यांनी व्यक्त केले.

पाकिस्तानचे खेळाडू हे देशासाठी खेळायचे, पण भारताचे खेळाडू मात्र स्वत:साठी खेळायचे. "आम्ही जेव्हा भारता विरूद्ध क्रिकेट खेळायचो, तेव्हा त्यांची म्हणजे भारताची फलंदाजी ही आमच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान होती. पण पाकिस्तानचे फलंदाज फलंदाजी करताना ज्या ३०-४० धावा करायचे, त्या धावा संघासाठी करायचे. याउलट भारताचे खेळाडू मात्र स्वत:च्या विक्रमांसाठी शतक ठोकायच्या मागे लागायचे. ते देशासाठी नव्हे, तर स्वत:साठी खेळायचे", असा इंझमामने दावा केला.भारताजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबद्दल  नेहमी शांत बसणारा इंझमाम काहीच बोलला नाही.शतक ठोकणे ही सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते 50 ओव्हर मैदानावर उभे राहावे लागते.

 "मला भारतीय संघाबद्दल नेहमी वाईट वाटायचं. आमच्याविरोधात खेळताना ते नेहमी दबावाखाली असायचे. मी ज्यावेळी नाणेफेकीसाठी जायचो, त्यावेळी भारतीय कर्णधाराच्या चेहऱ्यावर नेहमी टेन्शन असायचं. भारतीय कर्णधार नेहमी घाबरलेला असायचा. त्या काळात भारत हा आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी नव्हताच, वेस्ट इंडिज हा तेव्हाचा सर्वोत्तम संघ होता आणि त्यांच्यासारखे खेळाडू मी बघितले नाहीत." स्थानिक वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं आहे. 25 जून 1983 रोजी लंडनमधील  लॉड् र्सच्या मैदानावर वेस्ट इंडिज या सर्वोत्तम संघाला नमवून भारताने सर्वप्रथम विश्वविजेते पद प्राप्त केले हे विसरून चालणार नाही तसेच भारतीय संघ जर घाबरला असता तर एकदा नव्हे दोनदा विश्वचषक प्राप्त केला असता का? ही विचार करणारी गोष्ट आहे.आजही भारताकडे दर्जेदार,अष्टपैलू आणि स्फोटक फलंदाज आणि गोलंदाज आहेत की त्यांच्याकडे एकहाती सामना फिरवण्याची ताकद आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने तोपर्यंत होणे शक्य नाहीत, जोपर्यंत मोदी सरकार सत्तेत आहे, असे मत आधी आफ्रिदीने व्यक्त केले होते. त्यात आता त्याने आणखी गरळ ओकली आहे. "आम्ही (पाकिस्तान) भारताशी क्रिकेट खेळायला तयार आहोत, पण मोदी सरकार असेपर्यंत तरी हे शक्य नाही. कारण मोदी सरकार म्हणजे नकारात्मकता! मोदी सरकारच्या कार्यपद्धतीतून नकारात्मक भावना दिसून येते. पाकिस्तान भारताशी क्रिकेट खेळण्याबाबत कायम सकारात्मक आहे, पण भारतानेही थोडी सकारात्मकता दाखवायला हवी", असे आफ्रिदीने म्हटले आहे. कोरोनाविरूध्द मदतनिधीसाठी डावखूरा फलंदाज युवराज आणि फिरकीचा गोलंदाज हरभजन यांनी सोशल मीडियावर आफ्रिदीच्या कामाचे कौतुक केले त्याच आफ्रिदीने आपल्या "गेम चेंजर" या आपल्या आत्मचरित्रात भारतीय फलंदाज गौतम गंभीरचा माजोरडा म्हणून उल्लेख केला. दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा स्वतः काय ते पहावे.क्रिकेट सकारात्मक मग दहशतवाद काय? हे असे  नेहमीच चालत राहणार हे न संपणारे टिवटिवाट आहे.

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...