स्पॉट फिक्सिंग - एक आठवण
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगचे मुख्य सूत्रधार अंडरवर्ल्ड 'डॉन' दाऊद आणि त्याचा साथीदार छोटा शकील हे असल्याचे सांगत त्यांच्या इशा-यावरून काम केल्याच्या आरोपावरून एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यासह 26 जणांवर मोक्का लावण्यात आला होता. काय आहे हा मोक्का चला तर त्याच्या विषयी माहिती करून घेऊ. मोक्का म्हणजे काय ? : मोक्का म्हणजे 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा '. 22 फेब्रुवारी 1999 रोजी महाराष्ट्रात 'टाडा' ऐवजी हा कायदा लागू करण्यात आला. महाराष्ट्रापुरताच तो मर्यादित असला तरी दिल्ली पोलिसांनी हा कायदा लागू केला आहे. कोणाला लागू होतो ? : संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध प्रस्थापित झाल्यास मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येते. या कायद्यातील तरतूदीनुसार अटक केलेल्या आरोपीपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यांत आरोपपञ सादर झालेले असणे बंधनकारक आहे. त्यामुळेच या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दाऊद आणि छोटा शकीलला आरोपी बनविले असावे. त्यांच्यामुळे इतर आरोपींना मोक्का लावणे शक्य झाले आहे. तरतुदी : 'मोक्का' कायद्यातील 21 (3)...