त्या आठवणी...
* गेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी..........* *बंबात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची. *लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी माहीती नसायची. *ok,501* साबणाची वडी कपड्यावर घासायची... *Moti* साबणाचं कौतुक फक्त *दिवाळीला* असायचं. *शाम्पू* कुठला लावताय राव, *निरम्यानचं* डोकं धुवायचं... *दिवाळीच्या* एका ड्रेसवर *वर्षभर* मिरवायचं... *थोरल्याचं* कापडं धाकट्यानं *झिजेपर्यंत* वापरायचं... *चहा चपातीची* न्याहरी, *उप्पीट,पोहे* कौतुकाने असायचे, *पार्ले* बिस्किटाशिवाय चहाला दुसरे जोडीदार नसायचे... *गोल* पंक्तीत बसून सगळ्यांनी मिळून जेवायचं... *खर्डा ,भाकरी,झुणका* पंचपक्वानासारखं लागायचं. *गोट्या,विटीदांडू,लपाछपी........* कधी कधी *पत्त्यांचाही* खेळ रंगायचा... *काचाकवड्या,जिबली* नाहीतर..... *भातुकलीचा* डाव मांडायचा... अधून मधून *चिंचा,पेरू,आंब्याची* झाड शोधायचं... नाहीतर *जिभेला* रंग चढवत *गारेगार* चोखायचं... *गणगाटाची* बैलगाडी,त्याला त्याचाच *बैल* जुंपायचा... *शेंगा* चेचून केलेला चिक्की बाॅल दणकट असायचा... पानं चेचून केलेली *मेंहदी* हातावर खुलायची... *बाभळीच्या* शेंगाची जोडवी बोटात...